GM NEWS, FLASH : जामनेर तालुक्यातील टाकरखेडे ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदाचा शाखा अभियंता नितीन घोडके यांनी स्वीकारला पदभार . सरपंचांसह ग्रामस्थांनी केले सहर्ष स्वागत .

0
223

टाकरखेडा, ता. जामनेर, दि . २० ( शिवाजी डोंगरे ):- कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुदत संपलेल्या टाकरखेडे ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदी शासनाच्या आदेशानुसार जामनेर पंचायत समितीचे शाखा अभियंता नितीन घोडके यांची नियुक्ती करण्यात आली .
जामनेर तालुक्यातील टाकरखेडे ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून शाखा अभियंता पंचायत समिती जामनेर नितीन घोडके यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला .यावेळी सरपंच समाधान पाटील यांच्या वतीने स्वागत करण्यात आले . या प्रसंगी ग्रामसेवक चिंतामण राठोड ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी ,गावकरी उपस्थित होते. सर्वांनी प्रशासक म्हणून नितीन घोडके यांचे सहर्ष स्वागत केले .
यावेळी शिवाजी डोंगरे ,
भगवान पाटील, प्रल्हाद पाटील, राजू उघडे, प्रेमराज उघडे, सोपान डोंगरे, कमलाकर सुरडकर,पाडू ठाकूर, किसन केणे, बाबूलाल भोई, आनंदा कोते, भगवान भोई, ज्ञानेश्वर भोई,इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.