GM NEWS, नोकरी – व्यवसाय वार्ता : पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन आयोजन . जळगांव जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन .

0
184

जळगाव, दि. 21 ( मिलींद लोखंडे) : – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव कार्यालयातर्फे 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत कोविड विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता ऑनलाईन पध्दतीने “ पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ” आयोजन करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा व जिल्ह्याबाहेरील आस्थापना/कंपन्यांमधील विविध प्रकारच्या रिक्तपदांव्दारे मोठी सुवर्णसंधी जिल्हयातील युवक, युवतींसाठी देऊ केलेली आहे. या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपेार्टलवर विविध शैक्षणिक पात्रतेची एकूण 265 रिक्तपदे अधिसुचित करण्यात आलेली आहेत. यासाठी विभागाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणा-या किंवा ऑनलाईन अप्लाय केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती उद्योजकांच्या सोईनुसार शक्य असेल तेथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने घेतल्या जातील.
उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. किंवा प्लेस्टोअरमधून महास्वयंम ॲप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करावे. Employment पेजवरील Job Seeker हा पर्याय निवडून आपला नोंदणी/आधारक्रमांक व पासवर्डने साईनइन/लॉगईन करावे. आपल्या होमपेज वरील Job Fair हा पर्याय निवडावा. त्यानंतर जळगाव जिल्हा निवडा व फिल्टर बटनावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी Jalgaon Online Job Fair (Dt. २८.०९.२०२०२ to ३०.०९.२०२०२) या ओळीतील ॲक्शन मेनूतील दुस-या बटनावर क्लिक करावे. I Agree हा पर्याय निवडा, पात्रतेनुसार मॅचींग झालेल्या विविध कंपन्यांच्या रिक्त पदांसाठी Apply बटनावर क्लिक करावे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत 0257-2239605 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. या सुवर्णसंधीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.