GM NEWS, कृषी वृत्त : उन्नत शेती, समृध्द शेतकरी मोहिमेतंर्गत अनुदानासाठी अर्ज करण्याचे जळगाव जिल्हा कृषि विभागाचे आवाहन .

0
747

जळगाव, दि. 22( मिलींद लोखंडे) – महाराष्ट्र शासनाच्या उन्नत शेती, समृध्द शेतकरी मोहिमेतंर्गत कृषी विभागाच्या प्रचलित योजना अंतर्गत यांत्रिकीकरण या बाबीसाठी अनुदान देणेकरीता शेतक-यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

यासाठी राज्य शासनाचे mahadbtmahait.gov.in हे पोर्टल कार्यान्वित झाले आहे. कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत शेतक-यांचे अर्ज या पोर्टलवर ऑनलाईन प्रक्रियेव्दारे स्वीकारण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. सदर योजनेतंर्गत ट्रॅक्टर, ट्रॅक्टर चलीत औजारे व स्वयंचलीत औजारे खरेदी करण्यासाठी अनुदानाचा लाभ मिळण्यासाठीचे अर्ज या पोर्टलवर स्वीकारण्यात येतील. शेतक-यांची पोर्टलवर नोंदणी व अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती याबाबतची माहिती पोर्टलवर नोंदणी व अर्ज प्रक्रियेसाठी सुचना या सदराखाली देण्यात आली आहे. सदर योजनेतंर्गत जिल्हयास प्राप्त होणा-या भौतीक लक्षांक आणि प्राप्त निधी यांच्या मर्यादेत लाभार्थी निवड करण्यात येईल.

याअनुषंगाने जिल्ह्यातील इच्छुक शेतक-यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वत: अर्ज करावा अथवा नजीकच्या सेतु/सी.एस.सी सेटरला भेट देवून अर्ज करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन श्री. संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.