GM NEWS , प्रेरणादायी स्वानुभव वृत्त : वयोवृद्ध वडीलांसह कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेल्या पहूर पेठ येथील मुळ रहीवासी तसेच जळगांव पोलीस मुख्यालयी सेवेत असलेले पोलीस कर्मचारी सागर भावराव पाटील यांचे तरुणांना आवाहन . वाचा त्यांच्यांच शब्दांत …

0
595

पहूर , ता . जामनेर , दि . २३(शंकर भामेरे ) : – कोरोनावर यशस्वी रित्या मात करून वयोवृद्ध वडिलांसह घरी परतलेल्या पहूर पेठ येथील मूळ रहीवासी तसेच जळगांव पोलीस मुख्यालयी ‘कोरोना योद्धा ‘ म्हणून सेवत असलेले पोलीस कर्मचारी सागर भावराव पाटील यांनी सोशल मिडीयाद्वारे तरुणांसाठी शब्दांकित केलेले स्वानुभव त्यांच्याच शब्दांत ….
“मी सागर भाऊराव पाटील जळगाव पोलीस व माझे आण्णा वय 78/79 आम्ही दोघेही आपल्या सर्वांच्या सदिच्छांनी, आशिर्वादाने,कोरोणाआजारावर यशस्वी मात करत घरी आलो.बरेच दिवस शासन निर्देश पालन करूनही व्हायची ती चूक माझ्या कडून झालीच मी तरुण आहे मला काहीच नाही होणार या संभ्रमात राहीलो.परीणामी माझ्या मूळे वडील पोझीटीव्ह आले माझ्या वडिलांना वेळेवर Oxy level अगदी low झाल्याने जास्त त्रास होवू लागला. ऐण रात्री आण्णांना जळगाव शिफ्ट कराव लागले. त्यात अनमोल मेहनत राहीली ती आमचे पाहूणे डॉ.प्रशांत पांढरे,ज्ञानेश्वरभाऊ पांढरे ताई डॉ.मिनाक्षी पाटील आमचे मोठे बंधू अरविंदभाऊ देशमुख त्यांची आरोग्यदुत म्हणून जी ओळख आहे त्याची प्रचिती ही आली जळगाव सिव्हील ला रात्री 2:30 वा. बेड खाली नव्हता.स्वतः अरविंदभाऊंनी सिव्हील ला ऐत आण्णांना अॅडमीट केले.त्याही नंतर मी 10/11 दिवस झाले पाहतोय अरविंद भाऊ प्रत्येक वार्ड मध्ये वैयक्तिक पेशंटसना मग तो पेशंट कूठलाही असू द्या त्याला तब्येतीची चौकशी करत असतात.सिव्हिल येथील स्टाफ,सिस्टर्स,डॉक्टर,वार्ड देखिल अत्यंत आपूलकीची सेवा देत आहेत.सलाम त्या कोरोणा योद्ध्यांना त्यांच्या कार्याला आणि सेवेला.
थोडक्यात ,आपण तरूण आहोत.कोरोणा सिम्पटम्पस काही नाहीत.या अविर्भावात राहू नका.आपण बरे होतोच पण आपल्या मुळे वयस्कर माणसांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आणि तो पाहता येत नाही.कोरोणा आजाराला घाबरू अजिबात नका परंतु तुमची व परीवाराची काळजी घ्या शासनाने निर्देशांचे पालन करा . “