लोहारा कन्या शाळेचा विकास व गुणवत्ता वाढविल्या बद्दल आ.किशोर पाटील यांच्यातर्फे विशेष सन्मान .

1
269

लोहारा ता.पाचोरा दि. १० ( ज्ञाानेश्वर राजपुुुुुत ) : –  पाचोरा-भडगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांच्या संकल्पनेतू तालुक्यातील आदर्श शाळा व आदर्श शिक्षक यांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री मा.ना गुलाबराव पाटील हे होते .शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य,शिवसेने जिल्हा अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच पाचोरा तालुक्यातील शिवसेनेचे विविध पदाधिकारी जळगाव जिप चे माध्यमिक शिक्षण अधिकारी भास्कर पाटील पाचोरा चे गटशिक्षणाधिकारी विकास पाटील भडगाव चे गटशिक्षणाधिकारी परदेशी साहेब व समाधान पाटील शिक्षण विस्तार अधिकारी पाचोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडलाा . यामध्ये राज्यस्तरीय आदर्श शिक्षक जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक व लोकसहभागातून दोन लाखापेक्षा जास्त सहभाग मिळवलेल्या आदर्श शाळा यांचा विशेष सत्कार करण्यात आला .त्यामध्ये लोहारा कन्या शाळा पाचोरा तालुक्यातील आदर्श शाळा म्हणून पात्र ठरली लोहारा कन्या शाळेने गेल्या चार वर्षात साडे सात लाखाचा लोकसहभाग मिळवून शाळेचा भौतिक विकास केला यात नऊ वर्ग खोल्याची डिजिटल रंगरंगोटी ,स्मार्ट अँड्रॉइड बोर्ड,स्मार्ट टी व्ही, 5 संगणक ,लॅपटॉप,हँड वॊश स्टेशन,पिण्याच्या पाण्याची सोय,गॅस कनेक्टन, २ कपाट ,प्रत्येक वर्गात फॅन,५ टेबल,संडास मुतारी दुरुस्ती संपूर्ण शाळा डिजिटल केली त्यामुळे दरवर्षी शाळेचा पट वाढत आहे तसेच एक उपक्रमशील शाळा म्हणून लोहारा कन्या शाळेचे नावलौकिक आहे दर वर्षी शाळा विज्ञान प्रदर्शनात तालुका व जिल्हास्तरीय सहभाग घेत असून प्रथम क्रमांक पटकावला आहे या वर्षी शाळेचा राज्यस्तरिय विज्ञान प्रदर्शला निवळ झाली आहे गेल्या वर्षी शाळेला महाराष्ट्र शिक्षक पॅनल तर्फे राज्यस्तरीय सर्वांग सुंदर शाळा हा पुरस्कार मिळाला होता या शाळेच्या प्रगती बद्दल पाचोरा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय तात्यासाहेब श्री विकास पाटील विस्ताराधिकारी श्री समाधान पाटील व विस्तार अधिकारी श्रीमती सरोज गायकवाड व लोहारा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री बाबुराव धुंदाळे दादा यांनी लोहारा कन्या शाळेचे कौतुक केले शाळेला लोकसहभाग मिळवण्यासाठी मुख्याध्यापक कृष्णा तपोने ,सौ.उषा साळी , गजानन काटे , समाधान माळी ,शीतल महाजन, विलास निकम सर ,संध्या पाटील , दिनेश तेली सर ,भारती बोरसे मॅडम प्रयत्न करीत आहे व शाळेचा विकास करीत आहेत .

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

9 + seven =