GM NEWS, कृषी वार्ता : पहूर परिसरात झालेल्या पावसाने कपाशीचे नुकसान . खासगी व्यापारी करताहेत ३२०० ते ३५०० रुपये प्रति क्विंटलने खरेदी .

0
98

पहूर , जामनेर दि . २४ ( शंकर भामेरे ) :- पहूर परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने कापसाचे मोठे नुकसान झाले आहे . हाता -तोंडाशी आलेला घास हिरावल्या जात असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे .
पहूर परिसरात जास्त पावसामुळे यापूर्वीच उडीद , मुग , चवळी आदी कडधान्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यातच आता दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने कपाशीची बोंडे ओली झाल्याने कापसाची गुणवत्ता घसरली असून काळसर रंगाचा कापूस शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहे . ३२०० ते ३५०० रुपये प्रति क्विंटल दराने खासगी व्यापरी कापसाची खरेदी करत आहे . कपाशी पिकावर लाल्या रोगाचे सावट असून फूलं व पाने गळून पडत आहेत .