GM NEWS Big Breaking:- जामनेर -सावळदबारा बसचा अपघात, धडक देणारा डंपर फरार. ( व्हीडीओ )

0
744

जामनेर दि .४ ( शिवाजी डोंगरे ) : – जामनेर कडुन सावळदबारा जाणाऱ्या बसला शहरा जवळील लॉर्ड गणेशा स्कूल जवळ भरधाव येणाऱ्या डंपरने धडक दिल्याने बस रस्त्याखाली उतरल्याने होणारा अनर्थ टळला आहे . ही घटना आज दुपारी १ वाजेच्या दरम्यान घडली . जामनेर आगाराची बस क्र .MH 20 D 8621 ही बस नेहमी प्रमाणे फत्तेपुर मार्गाने सावळदबाऱ्याकडे प्रवासी घेऊन जात असतांना समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने या बसला कट मारला . त्यामुळे चालक वासुदेव बुंधे यांनी प्रसंगावधान राखत बसला खाली उतरवले यामुळ रस्त्यावर असलेल्या मुरूमामुळे बस पलटी होतांना वाचली आहे .झालेल्या अपघातामधे प्रवासी सुखरूप असुन डंपर मात्र न थांबता भरधाव वेगाने फरार झाले आहे . जामनेर तालुक्यात गौण खनिजांची अवैधपणे बहतुक करणाऱ्या डंपर चालकांची दादागीरी दिवंसेंदिवस वाढतच असुन रस्ता हा आपलाच आहे या अर्विभावाने हे डंपर चालक भरधाव वेगाने डंपर चालवत आहेत . या डंपर चालकांना आर्शिवाद कोणाचा ? सामान्य नागरीकांच्या जीवनाशी खेळणाऱ्या या डंपर चालकांचे मालक कोण ? या सर्व बाबींचा शोध प्रशासनाने घेऊन कारवाई करणे आता गरजेचे आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here